मरीन ड्राइवला पोचलो तेव्हा सहा वाजले होते. आणखी अर्ध्या तासात काळोख पडेल. वर्दळ नेहमीसारखीच. मस्तपैकी जागा पकडली पाहिजे. निदान जवळपास डिस्टर्ब करणारं - काय करतोय म्हणून डोकावून पाहणारं कुणी नको. आज कुठल्याही परिस्थितीत रणजीतला कथेचा फर्स्ट ड्राफ्ट दिला पाहिजे. गेला आठवडाभर आज देतो, उद्या देतो, कंटेंट रेडी आहे फ़क्त कागदावर उतरवायचय, उद्या पक्का - असं करून त्याला टाळत आलो. आणि आज सकाळी पावणे पाचला त्याचा SMS आला की, 'I knw..u hvnt wrttn anythin..i'll KILL u'. सकाळी नऊला उठलो तेव्हा कुठे तो पाहिला. मग अर्धा तास दात घासत, एक तास बाथरूममधे अंघोळ करताना आणि त्यानंतर १२ पर्यंत डोरेमॉन बघत काय लिहावं याचाच विचार करत बसलो आपण. तरी काहीच srtike होत नव्हतं. रणजीतला हवीय एक लव स्टोरी. मग त्यात पाणी घालून तो एकांकिका बनवणार किंवा अगदीच नाही जमलं तर शॉर्ट फ़िल्म. त्याच्या अपेक्षाही भन्नाट असतात. 'अजून कुणालाही सुचली नसेल अशी प्रेमकथा लिही... रोजरोजचं नको त्यात...बस स्टॉप, ट्रेनमधली ओळख... मग ओळखीचं रूपांतर प्रेमात अशी रटाळ स्टोरी नकोच... काहीतरी फ्रेश हवं आणि सगळ्यांना अपील होणारं....' . एवढ सगळं हवय आणि ते पण सामान्य माणसाच्या बाबतीत. अशक्य ! आता इतक्या वर्षांत लोकं त्याच त्याच पध्दतीने प्रेमात पडत असतील तर आपण काय करणार ? CCD ला जाऊन कॉफ़ी पीत पीत लिहूया असं ठरवलं दुपारी. कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी दीपक घेईल. पण किती वेळ टेबल अडवून बसणार? आणि कुणी ओळखीचं भेटलं तर औपचारिक बोलावं लागणार. त्यात आणखी वेळ जाणार. त्यापेक्षा 'समुद्रकिनारी' खारे दाणे खात बसू.
आणि असा प्लान ठरला.
कठडयावर मांडी घालून बसलो, चपला नीट काढून पायाखाली घेतल्या. बॅगेतून डायरी काढली. दहा वेळा रिफिल बदललेलं montex चं लकी पेन.… त्याला एकदा ओठाला लावलं. समोरच्या समुद्राकडे लॉन्ग पॉज घेऊन पाहिलं. एक खोल दीर्घ श्वास आणि कागदावर लिहिणार तोच खांद्याला कुणी तरी हात लावला - "भाईसाब कुछ पैसा देगा?" एक सत्तर वर्षांची म्हातारी माझ्या बाजूला बसलीय. पोशाखावरुन कॅथलिक वाटतेय. चेहर्यावर सुरकुत्या आहेत. बोलताना गाल आत ओढले जाताहेत. केस पांढरेफटक. ती पुन्हा म्हणाली "मेरा कोई नहीं है। सब मर गया। कुछ पैसा देगा?".
मी भिकार्यांना पैसे कधीच देत नाही. म्हणजे आधी द्यायचो. पण काही महिन्यांपूर्वी मंडळाच्या व्याख्यानमालेत एका समाजसेविकेचे लेक्चर ऐकले. तिच्या मते भिकार्यांना पैसे देण्यापेक्षा खायला काही तरी द्या. बिस्किटचा पुडा द्या. तिने इतक्या पोटतिड़कीने सांगितलं की, मी माझ्या बॅगेत पारले ग्लुको बिस्किटचे छोटे पुडे ठेऊ लागलो. आला भिकारी की दे बिस्कीट. एकदा एका लहान मुलाला तो पुडा देताना त्याने सांगितलं "हम ये नहीं खाताय, क्रीम का दो ना". मुलं ती मुलंच. रणजीतला ही गोष्ट सांगताच त्याने याच थीमवर शॉर्ट फ़िल्म केली. त्या लहान मुलांचे कुरतडलेलं बालपण हास्याचा विषय होऊ नये असचं मला वाटत होतं.
त्यानंतर मी भिकार्यांना काहीच देत नाही. आपोआप ते कंटाळून पुढे जातात.
तरी पण त्या म्हातारीला म्हटलं 'पैसा नहीं है, कुछ खाओगी?" तिने नकारार्थी मान हलवली. मग मी नायक आणि नायिका कुठे भेटतील या विचारात गुंतलो. शाळा- कॉलेज - हॉस्पिटल - लाइब्रेरी - नाट्यगृह - चौपाटी - कॉमन भेळवाला. किंवा असं केलं तर.… नायक आणि नायिका एकमेकांना फेसबुकवर ओळखतात चेहर्याने.
माझ्या बाजूला बसलेली म्हातारी दर थोड्या वेळाने बाजूच्या कपल्सकडे, इवनिंग वॉकला आलेल्यांकडे पैसे मागत होती "भाईसाब कुछ पैसा देगा?" हे वाक्य सारखं कानावर पडत होतं. एकाने म्हातारीला सांगितल "आप मुझे बताओ आपकी कहानी'. मग म्हातारीने तेच "मुझे कोई नहीं है, अकेली हुँ, कुछ पैसा दोगे? दस रूपया?" हे सांगायला सुरवात केली. त्या गृहस्थाने सर्व शांतपणे ऐकलं आणि तसाच निघुन गेला. मग म्हातारीने तोंडातल्या तोंडात त्याला काही शिव्या दिल्या.
नायक आणि नायिका एकमेकांना भेटायचं ठरवतात. पहिल्यांदाच भेटणार असतात. वातावरण निर्मिती करता येईल. कॉफ़ी शॉप की क्रॉसवर्ड ? क्रॉसवर्ड डन्.
माझ्या बाजूला बराच वेळ पासून एक माणूस फोन वर बोलतोय. ऐकायला स्पष्ट येतेय.
"जी मै मुकुल बात कर रहा हुँ। कपूर जी कैसे हो आप? पहचाना? सर मैं ऑडिशन के लिए आया था। आपने कहा था, कुछ काम होगा तो बतावोगे।…जी सर, कल ही आये हो बैंगकॉक से ? कैसे रही आपकी ट्रीप ? जी बिजी हो.....ok सर कुछ काम हो तो बता दीजिये। …जी यही नंबर है मेरा। बाय सर have a good day. "
मग दूसरा फ़ोन कॉल.
"जी क्या मैं शर्माजी से बात कर सकता हुँ? सर, मैं मुकुल, सेट पे मुलाकात हुई थी। आपने कहा था कुछ काम होगा तो बतावोगे? हा..सर कैसी है अभी आपकी तबियत, ठीक है सर बाद में बात करेंगे। "
या संवादावरुन आणि वाक्यावाक्यागणिक टपकणार्या नम्रतेतून हे स्पष्ट कळत होतं कि ही व्यक्ती स्ट्रगलर आहे.
मग आणखी काही फोन कॉल्स. तीच नकारघंटा. तो उदास चेहर्याने निघुन गेला.
नायिका शाळेत शिकवत असते. आपल्या नायिकेसाठी नायक एक नाटुकले लिहून देतो. नायिका लहान मुलांना घेऊन ते नाटक बसवते. मग या सर्व घडामोडीत ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.
पुढे?
पुढे?
लग्न?
की इथेच शेवट करावा?
चटपटित संवाद नंतर लिहिता येतील. ब्लू प्रिंट ओकेय. पण तितकिशी भिड़त नाहीय मनाला.
ती म्हातारी कुठे गेली? आता तर इथे होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा