शुक्रवार, ५ जुलै, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 5 July

 1. On Reading:  André Kertész


André Kertész या विख्यात छायाचित्रकाराने काढलेले फोटो या पुस्तकात आहेत. बागेत, घराच्या गॅलरीत, नदीकाठी, लायब्ररीत वाचनात तल्लीन झालेल्या माणसांचे फोटो पाहताना मौज वाटते. आजही हे चित्र बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. पुस्तकाऐवजी लोक किंडल वा मोबाईलवर वाचत असतील. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं तरी हरेक काळात वाचणारी माणसे असतीलच. 



हे पुस्तक पुढील लिंक वर वाचता येईल: https://archive.org/details/onreading0000kert_q2l8

2. John G. Walter चं कार्टून: 



3.: That word by Mahmoud Darwish (A River Dies of Thirst: journals)

पॅलेस्टिअन कवी महमूद दर्विश यांची कविता. 

That word

He liked a word
He opened the dictionary
He couldn't find it
or an imprecise meaning for it
but it haunted him at night
musical, harmonious
with a mysterious nature
He said: 'It needs a poet
and some metaphor so that it turns green and red
on the surface of dark nights'
What is it?
He found the meaning
and the word was lost to him.


4. कानगोष्टी:  Doris Day: Enjoy Yourself


5. Watchlist: 
नुकताच राष्ट्रीय वाचन दिवस आपण साजरा केला. त्यानिमित्ताने केरळातील ग्रंथालय चळवळीचे प्रणेते PN Panicker यांच्या कार्याची ओळख करून  देणारा The Hindu चा  विडिओ. 




शुक्रवार, २८ जून, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 28 June


1. किशोर मासिकाचा जुना संग्रह 

किशोर या मुलांच्या मासिकाचा शोध मला फार उशिरा लागला. ठकठक आणि चांदोबाचे जुने अंक यावरच आमचं बालपण गेलं. किशोर मासिकाचे जुने अंक (अगदी १९७१पासूनचे) ऑनलाईन उपलब्ध आहेत. जुने अंक चाळता सापडले कि यात दिग्गजांनी लिहिलंय. दुर्गाबाई, पुलं, कुसुमाग्रज, कुरुंदकर इ. इ. 

या मासिकांत गोष्टी, कविता, माहितीपर लेख यांचा समावेश आहे. कव्हर पेजेस नॉस्टॅल्जिया जागवणारी आहेत. इंग्रजीतील न्यू यॉर्कर मासिकाची कव्हर पेजेस अशी इंटरेस्टिंग असतात.  उदाहरणादाखल:-


जुने आणि नवीन अंक पुढील लिंक वर वाचता / डाउनलोड करता येतील. 

https://kishor.ebalbharati.in/Archives/


2. The cooking of books: a literary memoir


"लेखकाच्या आयुष्यात त्याच्या जोडीदारानंतर जर कुठली महत्वाची व्यक्ती असेल तर ती म्हणजे संपादक" असे रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचे नवीन पुस्तक हे एक प्रकारे साहित्यिक आत्मकथन आहे. यात त्यांनी रुकून अडवाणी या त्यांच्या संपादकाविषयी भरभरून लिहिलंय. त्यांच्या पुस्तकांना व साहित्यिक कारकिर्दीला आकार कसा येत गेला, या प्रवासात त्यांच्या संपादकाची भूमिका काय होती यावर त्यांनी लिहिलंय. गुहा नामांकित इतिहासकार आहेत. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांना अडवाणी यांच्यासारखा संपादक लाभला. अडवाणी Oxford University Press India च्या संपादक मंडळात होते. त्यांनी गुहा यांची सुरुवातीची पुस्तके छापली. 

वयपरत्वे हे नातं अजून घट्ट बनत गेलं. एखाद्या पुस्तकावर संपादकीय संस्कार होत असताना लेखक आणि संपादक यांच्यात क्राफ्टच्या अनुषंगाने पत्रांद्वारे काय चर्चा होत होती ते वाचायला वाचकांना आवडेल. 


3. इंदिरा संत यांची कविता: पत्र लिही

पत्र लिही पण नको पाठवू

शाईअमधुनी काजळ गहिरे

लिपिरेषांच्या जाळी मधुनी

नको पाठवू हसू लाजरे;


चढण लाडकी भुवईमधली

नको पाठवू वेलांटींतुन

नको पाठवू तिळ गालिचा

पुर्णविरामाच्या बिंदूतुन


नको पाठवू अक्षरातुनी

शब्दामधले अधिरे स्पंदन,

कागदातुन नको पाठवू

स्पर्शामधला कंप विलक्षण


नको पाठवू विज सुवासिक

उलगडणारी घडी घडीतुन,

नको पाठवू असे कितीदां

सांगितले मी; तू हट्टी पण


पाठविसी ते सगळे सगळे

पहिल्या ओळीमध्येच मिळते

पत्र पुढचे त्यानंतर पण

वाचायचे राहुन जाते.


4. कानगोष्टी:   All you have is now!


5. Watchlist: Night and Fog

कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स, होलोकास्टवर बनवलेली मी पाहिलेली प्रामाणिक डॉक्युमेंटरी. 

Night and Fog from UMSchoolOfCommunication on Vimeo.

शनिवार, २२ जून, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 22 June

1. Mixing Work with Pleasure: My Life at Studio Ghibli

स्टुडिओ जिबली त्यांच्या ऍनिमेटेड चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेच. Toshio Suzuki यांनी तिथे प्रोड्युसर असतानाचे अनुभव यात मांडले आहेत. काही गोष्टी फारच इंटरेस्टिंग आहेत. 


ज्यांना स्टुडिओ जिबलीच्या चित्रपटांत रस आहे, चित्रपट निर्मितीमागची प्रोसेस समजून घ्यायची आहे त्यांनी वाचलेच पाहिजे असं पुस्तक. 


2. Concealing caste: Narratives of Passing and Personhood in Dalit Literature

जात लपवल्यामुळे समाजात भोगाव्या लागलेल्या परिणामांच्या  कथा या कथासंग्रहात आहेत. इतर भाषांतून इंग्रजीत अनुवादित केल्या आहेत. यात शरणकुमार लिंबाळे, बाबुराव बागुल या मराठी लेखकांच्या  कथा आहेत. 

या कथा तुम्हाला पछाडतात. 

3. मंगलेश डबराल यांची कविता: बाहर 


4. कानगोष्टी : Every Moment  

5. Watchlist: Coin Operated






गुरुवार, १३ जून, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 14 June

 1. गामक घर आणि माधव ज्युलियन यांची कविता 


'गामक घर' हा मैथिली भाषेतला 2019 चा चित्रपट आहे. ही तीन पिढ्यांची 'घर' ही संकल्पना केंद्रस्थानी ठेऊन सांगितलेली कथा आहे. 1998, 2010 व  2019 या काळात कुटुंबातील नात्यांत, घरात काय बदल झालेत हे दिसतं. लग्न, बारश्यासारख्या समारंभात आधी एकत्र येणारं कुटुंब, माणसांच्या राबत्यामुळे गजबलेलं घर- हळूहळू कर्ती माणसे निवर्तली कि ओसाड -दुर्लक्षित  पडलेलं विदारक वाटतं. जागतिकीकरणामुळे शहरं माणसांनी ओसंडून वाहू लागली तर एकीकडे गावं ओसाड व भकास झालीयेत. नात्यांत देखील तो पूर्वीसारखा ओलावा राहिला नाही. 

माधव ज्युलियन यांच्या कवितेत बालपणीच्या घराबद्दलच्या आठवणी आहेत. जे हरवलंय त्याची नोंद आहे. 
आमुचे घर छान
शेजारी वाहे ओढा
कागदी होड्या सोडा
दूर जाती II १ II

चतुर नव्हे तर
अभ्रकी पंखांचे ते
 विमान उडे तिथे
उन्हामाजी II २ II

उथळ वाहे पाणी
नितळ थंडगार
नाचता त्यात फार 
मौज वाटे II ३ II 

पाहून अंग ओले 
भरते रागे आई
मागून देई काही 
खाऊ गोड II ४ II 

आमुचे घर छान 
परसू लांब रुंद
मोगरा जाई कुंद 
फुलतात II ५ II

खोबरे झेंडूतील 
मागतो सदा बाळ
झेंडूचा पहा काळ 
खोडकर II ६ II

अडूळशाची फुले 
देठात थेंब गोड
करितो गोड तोंड 
मुलांचे तो II ७ II

सोलून कोरफड 
पाण्यात धुता साफ
बर्फ हो अपोआप 
काचेवाणी II ८ II

आमुचे घर छान 
म्हणती आम्हा द्वाड
करितो परी लाड 
बाबा-आई II ९ II

अंगणी सरावल्या 
खडूने काढू शिडी
लंगडी चढोवढी 
खेळायचा II १० II

घरात जिन्याखाली 
ताईचे घरकुल
खड्यांची थंड चूल
पक्वान्न दे II ११ II

भांडून केव्हा केव्हा 
म्हणतो जा फू गडी!
लागेना परी घडी 
एक व्हाया II १२ II

आमुचे घर सान 
आता ते कुठे गेले
बाल्याचे हे भुकेले 
मन पुसे II १३ II

2. Absolute Khushwant

काही वर्षांपूर्वीची गोष्ट. खुशवंत सिंगांबद्दल खूप ऐकलेलं. दर रविवारी HT मधे येणारे त्यांचे सदर (Between us) वाचत होतोच, पण मुद्दाम निवडून पुस्तक वाचावं असं वाटलं नव्हतं. मित्रांनी 'Train to Pakistan" वर तोंडभर स्तुती केली होती. लाइब्रेरीत 'Absolute Khushwant' वाचायला घेतलं आणि तासा दोन तासांत जे काही वाचलं त्यामुळे मी अक्षरश: भारावला गेलो. त्यानंतर ते माझ्या रीडिंग लिस्टचा भाग झाले. ताजं, खुसखुशीत आणि निर्भीड (बोल्ड) लिखाण ही त्यांची खासियत. त्याच पुस्तकात 'माझ्या आयुष्यात आलेल्या बायका', 'माझ्या लेखक असण्यावर' 'दिल्ली शहरावर' हे लेख आहेत. मुळापासून वाचावे असे हे लेख. "जर तुम्ही पत्रकार असाल तर दिल्ली शहरात तुमच्यावर उपाशी मरण्याची पाळी कधीच येणार नाही, इतक्या रोज परिषदा Conference होत असतात, त्यानंतर खाण्याची (आणि पिण्याची) सोय असते" हे त्यांचेच उद्गार. रोखठोकपणा हा जगण्याचा आणि पर्यायाने लेखनाचा स्थायीभाव. त्यांना एकाने त्यांच्या लेखक असण्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी मस्करीत म्हटलं होतं "क्या पूछते हो मेरे कारोबार का हाल, बेचता हूँ आइनें अंधो के शहर में".

3. What You Missed That Day You Were Absent from Fourth Grade

असं तुमच्यासोबत कधी झालंय का कि तुम्ही शाळेला दांडी मारलीत आणि त्याच दिवशी नेमकं काही महत्वाचं घडलंय  किंवा शिकवलंय? दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर मग मित्रांनी ते तिखटमीठ लावून सांगितलंय? 

What You Missed That Day You Were Absent from Fourth Grade ही कविता पण त्याच कल्पनेतून कवीला सुचली असावी. संपूर्ण कविता वरील लिंक वर आहे. या कवितेत तो / तीने  चौथ्या इयत्तेतील एक दिवस शाळेला बुट्टी मारल्यामुळे काय हुकलंय याची यादी आहे. तुम्ही जर या गोष्टी नीट पाहिल्यात उदा. 

how to stand still and listen to the wind किंवा  how peeling potatoes can be a form of prayer तर असं लक्षात येईल कि या गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाहीत.  त्या अभ्यासक्रमाचा भाग नसतात. 

The English lesson was that I am

is a complete sentence.

मोठं झाल्यावर, संकटांना तोंड देताना असं वाटतं ह्या गोष्टी शाळेत शिकवल्या असत्या तर बरं झालं असतं. 

तरी देखील कवितेतील Mrs. Nelson सारखे असे काही शिक्षक असतात जे अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आपल्याला घडवत असतात. आपल्या जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा असतो. 

ही कविता Poetry Unbound: 50 Poems to Open Your World' या कवितासंग्रहात आहे. 



4.कानगोष्टी: In the Wee Small Hours of the Morning

Song by Frank Sinatra


5. Watchlist: 

आकाशवाणी पुणे केंद्राच्या संग्रहातील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची पु. ल. देशपांडे यांनी घेतलेली मुलाखत.




शुक्रवार, ७ जून, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 7 June


1. Wild Problems: A Guide to the Decisions That Define Us


निर्णय कसे घ्यावे यावर बरीच पुस्तके उपलब्ध आहेत. त्यात अजून एक. या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे कठिण निर्णय (Wild problems) कसे सोपे करावे यासाठी शास्त्रज्ञांनी, तत्वचिंतकांनी, कलावंतानी कसा विचार केला ( इतिहासातील उदाहरणे ) यांचा समावेश यात आहे. यात चार्ल्स डार्विनने लग्न करावं कि करू नये याविषयी त्याच्या डायरीत केलेली नोंद interesting आहे . लग्न, पालकत्व, करिअर बदल या कठिण निर्णयांची उकल कशी करावी? संशोधन काय सांगते हे मांडलंय. 

2.  'पंखा'ची अर्पण पत्रिका

प्रकाश नारायण संतांच्या लंपन कथामालेतील पंखाची अर्पणपत्रिका मी वाचलेल्यांपैकी सर्वात आवडलेली. 

लंपनच्या कथांवर आता  वेबसिरिज आलीय. 




3. शिवमंगल सिंह ‘सुमन’ यांच्या 'मिट्टी की बारात' या कवितासंग्रहातील कविता : ठहराव 

तुम तो यहीं ठहर गये  

ठहरे तो किले बान्धो  

मीनारें गढ़ो  

उतरो चढ़ो  

उतरो चढ़ो  

कल तक की दूसरों की  

आज अपनी रक्षा करों,  

मुझको तो चलना है  

अन्धेरे में जलना है  

समय के साथ-साथ ढलना है  

इसलिये मैने कभी  

बान्धे नहीं परकोटे  

साधी नहीं सरहदें  

औ' गढ़ी नहीं मीनारें  

जीवन भर मुक्त बहा सहा  

हवा-आग-पानी सा  

बचपन जवानी सा।

 

4. कानगोष्टी - Ashokan Farewell by Jay Ungar and Molly Mason

5. Tales from the Vienna Woods - André Rieu












शुक्रवार, ३१ मे, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 31 May

 1. सोनेरी किल्ला

मला नेहमी असे वाटत आलंय कि सत्यजित रे यांना लेखक आणि संगीतकार  म्हणून तितकीशी प्रसिद्धी वा लक्ष नाही मिळालंय, जे ते डिसर्व करतात. या  धगधगत्या अहमदाबादच्या उन्हाळ्यात या रविवारी मी त्यांची  'सोनेरी किल्ला' ही छोटीशी रहस्य कथा वाचून संपवली. बाकी उन्हामुळे घरातून बाहेर जाता येणं शक्य नव्हतं. 

त्याच्या फेलूदा या डिटेक्टिव्ह सिरीज मधली ही कथा. कलकत्त्यातील एका लहान मुलाला त्याच्या पूर्वजन्मातील काही गोष्टी आठवतात व तो विक्षिप्त वागू लागतो. त्याच्या बोलण्यात सोनेरी किल्ल्याचा व गुप्त खजिन्याच्या विषय येतो आणि त्याला प्रसिद्धी मिळते. एक परमानसशास्त्रज्ञ त्याला सोबतीला  घेऊन मोहिमेला निघतो. त्या लहान मुलाचे वडील फेलूदाकडे ही केस घेऊन येतात. फेलूदा आणि त्याचा सहकारी तोपशे यांचा मग प्रवास सुरु होतो. 



मध्ये अनेक कॅरेक्टर्स येत जातात आणि संशयाचा फेरा सुरु होतो. अनेक साहसांनी भरलेला त्यांचा प्रवास, अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे या कथा मस्त जमल्यात. 

अशोक जैन यांनी या पुस्तकाचा अनुवाद केलाय. अशोक जैन यांची ओळख  'राजधानीतून' या म.टा.तील सदरासाठी आहेच, त्याशिवाय अनेक भाषांतरित पुस्तकांसाठीही. 

सोनार केल्ला या सत्यजित रे यांनीच डायरेक्ट केलेल्या चित्रपटातील ही फेलूदा थिम पण भारीय. 



2. Miss Rumphius by Barbara Cooney



हे छोटंसं पुस्तक Alice नावाच्या मुलीची गोष्ट सांगतं. तिचं समुद्रकाठी घर आहे. तिचे आजोबा कलाकार आहेत. तिने आजोबांना वचन दिलंय कि त्यांच्यासारखंच मोठं झाल्यावर ती जग फिरेल आणि म्हातारी झाल्यावर समुद्रकाठी विसावेल. तिचे आजोबा तिला सांगतात कि अजून एक गोष्ट कर: या जगातून जाण्याआधी हे जग अजून सुंदर कसं बनवता येईल हे बघ. मग ठरल्याप्रमाणे ती शहर सोडून प्रवासाला निघते, जगभर भटकंती करते आणि म्हातारपणी समुद्राकाठी घर घेते. आजोबांना वचन दिलेली तिसरी गोष्ट पूर्ण करण्यासाठी ती फुलांची झाडे लावते. पक्षी, वारा त्यांची बीजे दूरवर नेतात. लोकांच्या चेष्टेला भीक न घालता काम सुरु ठेवते. दरवर्षी उन्हाळ्यात ती फुलं फुलतात आणि ते गाव रंगांनी भरून जातं.

-

 हे जग अजून सुंदर कसं बनावं यासाठी आपण काय करू शकतो ? 


3. कोण दिवस येतो कसा, कोण जाणतो  ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कीर्तनाचा फिल्म्स आर्काइव्हने केलेला हा विडिओ पाहण्यात आला. 

कोण दिवस येतो कसा, कोण जाणतो ।।धृ ।।

एक दिवस हत्तिवरी, मिरविती त्या नवऱ्यापरी ।

एक दिवस मीठ भाकरी दारी मागतो  ।।

एक दिवस मान जनी, चवरी डुलतील तनी ।

एक दिवस न पुसे कुणी, सोडी प्राण तो ।।

ऐसा हा विधि-लिखित, जीवांना त्रास देत ।

तुकड्याची मात नव्हे, शास्त्र बोध तो ।।

असं सांगण्यात येतं कि या कीर्तनाला कोयना भूकंपाने केलेल्या विध्वंसाची पार्श्वभूमी आहे.

कोणता दिवस कसा येईल याची अनिश्चितता आपल्याला सजग राहण्याचा उपदेश करते



4. कानगोष्टी : Charlie Parker With Strings

Recommended!!


5. काय नवीन?

स्टीवन किंगचा नवीन कथासंग्रह आलाय. You Like It Darker



<iframe style="border-radius:12px" src="https://open.spotify.com/embed/album/1DPRDrZgfU3rAo2SL4GrZw?utm_source=generator&theme=0" width="100%" height="352" frameBorder="0" alowfullscreen="" allow="autoplay; clipboard-write; encrypted-media; fullscreen; picture-in-picture" loading="lazy

शुक्रवार, २४ मे, २०२४

या आठवड्यातील पाच गोष्टी - 24 May

1. Town Is by the Sea

या आठवड्यातील वाचलेलं पुस्तक Joanne Schwartz चं "Town Is by the Sea".



या पुस्तकात रेखाटने आहेत Sydney Smith ची.


कोळशाची खाण असलेल्या गावातील एका लहान मुलाची दिनचर्या- daily routine अशी या पुस्तकाची थिम आहे. त्या मुलाचे वडील समुद्राखाली असलेल्या खाणीत कामगार आहेत. त्याचे आजोबाही खाण कामगार होते.


सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतचा मुलाचा दिनक्रम यात आहे. मग त्यात मित्रासोबत बागेत झोका घेणं, आईने सांगितलेल्या गोष्टी बाजारातून आणणं असो , दुपारी आजोबांच्या थडग्याला भेट देणं आणि संध्याकाळी बाबांची वाट पाहणं.


दिवसभर त्याला आपले बाबा खोलवर अंधाऱ्या खाणीत काम करताहेत याची आठवण येत असते.

पुस्तकातली रेखाटने खूप सुंदर आहेत आणि त्या लहान मुलाच्या भावविश्वाचा ठाव घेणारी आहेत.

पुस्तक या लिंक वर वाचता येईल.


2. Perfect Days

या आठवड्यात पाहिलेला नितांत सुंदर असा जपानी सिनेमा.



या सिनेमात conflict काहीच नाहीये. काहीच धक्कादायक घडत नाही.  हिरायामा नावाच्या साठीतील  सार्वजनिक संडास साफ करणाऱ्या एका सफाई कामगाराची गोष्ट.  त्याचा दिनक्रम. आपण नेहमी एक समज करून घेतो कि समाजाच्या दृष्टीने अशी 'हलकी' कामे करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य समृद्ध नसेलच. आनंदी नसतील राहत ती. या चित्रपटाचा नायक त्याच्या कामात आणि आयुष्यात खुश आहे. त्याचं एक सेट रुटीन आहे रोजचं आणि सुट्टीच्या दिवसाचं. वर्षानुवर्षे ते चालूय. आजच्या डिजिटल युगात त्याचं अनालॉग आयुष्य स्लो वाटेल. बघितलाच पाहिजे असा सिनेमा. द गार्डियन मधला review इथे वाचता येईल. 


3. पंच मधील कार्टून 



पंच मासिकातील जुने  कार्टून.  १९१८ साली प्रकाशित झालेले . जगभरात चाललेल्या युद्धयांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा बघावेसे वाटले. 

4. On not finishing a book

Alberto Manguel - अथ ते इति पर्यंत पुस्तके वाचून न संपवण्याबाबतचं मनोगत.

त्यांच्या मते पुस्तके अर्धवट वाचून ठेवण्यात गैर काहीच नाही. पुस्तके वाचता वाचता आपणही बदलत जातोच. एखादं पुस्तक परत वाचताना आपणही बदललेले असतो.  We never enter the same book twice.

कधी कधी अर्धवट वाचलेल्या पुस्तकांना दुसरी संधी देता येऊ शकते. कधी कधी खूप चांगलं पुस्तक पुरवून पुरवून वाचण्यासाठी अर्धवट ठेवलेलं असतं. हा लेख इथे वाचता येईल.

5. सध्या काय वाचतोय ?

गीत चतुर्वेदीचे 'सिमसिम'.  फाळणीच्या पार्श्वभूमीवर भारतात स्थलांतरित झालेल्या सिंधी युवकाची गोष्ट. त्याबद्दल लिहीन पुढील भागांत.