फॉक्स ट्रैवलर वर एक मस्त शो आहे - "One Man and His campervan". मार्टिन डोरे हा खादाड, भटक्या, मनमौज्या प्राणी (ही विशेषणे माझ्या खास आवडीची) स्वत:च्या १९७० च्या क्लासिक campervan मधून राणीच्या साम्राज्यात भटकत असतो.मनात येईल तिथे मुक्काम, स्वत: एक्सपेरिमेंट करणारा कुक म्हणून एखाद्या तलावाच्या काठी किंवा मोकळ्या रानात निळ्या आभाळाखालीं जी साधने उपलब्ध होतील त्यातून जिभेला पाणी सुटेल असे पदार्थ बनवतो.कधी त्यात गळाला लागलेला लॉबस्टर असतो तर कधी लोकल चीज़ फैक्टरीतलं ताजं चीज़ असतं.मोजक्या साधनांतून जे बनवतो ते मस्तच असतं.पण सर्वांत भावणारी गोष्ट म्हणजे निवांतपणा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी निद्राधीन होईपर्यंत फक्त धावपळ करणार्या प्रत्येकाच्या मनात निवांतपणे, उनाडपणे जगावं असं वाटत असतं-ते स्वप्न मार्टिन स्वतः जगतोय याची थोडी असूया वाटतेच.त्याउपर तिथली छोटी छोटी गावे, डोंगर दर्या, नजर जाईल तिथ पर्यंतचे हिरवेपण, वाटेत मधेच भेटायला येणारे छोटेसे ओढ़े, दूध देणार्या महाकाय गायी सगळं मनाचा ठाव घेणारं हे आपल्या शहरी निबिड जीवनात नाहीये याची खंत वाटते.
पाडगावकर म्हणतात ते अगदी खरंय-"एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून". प्रत्येकाच्या मनात एक जिप्सी दडलेला असतो,पण जसजसं मोठे होत जातो तसे टाईची गाठ मारता मारता त्यालापण मारून टाकतो.
लहानपणी मी आणि माझा भाऊ एक वेगळाच खेळ खेळायचो. एक लहान वीट घ्यायची. तिला रोज पाण्याने ओलं करायचं. जास्त ऊन नसेल अशा कोंदट ठिकाणी ठेवायचं. काही दिवसांनी मग त्यावर हिरवशार बारीक स्पंज सारखं गवत उगवायचं (ज्याला बॉटनीत मॉस म्हणतात)हे झालं आमचं अमेजॉनच जंगल. मुद्दाम कर्कटकाने त्यावर चिरा काढायच्या-ह्या नद्या. थोड्या दिवसांनी त्यावर लहान सहान सुश्मजीव फिरायचे. मुंग्या असायच्या. इथपर्यंत आल्यावर खरा प्लॉट सुरु व्ह्यायचा आमच्याकडे एक छानसं भिंग होतं. त्यातून ह्या सर्व गोष्टी तासंतास पहायच्या. स्वताला आपण हेलीकॉप्टरमधे बसलो आहोत आणि उंच आभाळातून हे जंगल दिसतय अशी कल्पना करायची. लाल मुंग्या दुष्ट असतात (कारण त्या चावतात!) आणि काळ्या मुंग्या गरीब बिचार्या म्हणून त्यांना वाचवणं आपलं कर्तव्य आहे असे वाटायचे.
एप्रिल मे महिन्याच्या सुट्टीत गावी जात असू. त्यावेळी काय पाहू अन काय नको असे होई. सकाळी एकदा पोटात भर पडली क़ी दुपारी घरात हजर आणि मग परत संध्याकाळी मोर्चा. दिवसभर भटक भटक भटकायचं, पाय दुखेपर्यंत. पाबळाच गार पाणी चेहर्यावर मारल्यावर सगळा क्षीण जायचा. झाडाच्या सावलीत वरच्या आभाळातील ढगांचे बदलते आकार बघत पहुडायचं. पाटाच्या कडेकडेने जाताना अवचित एखादी धामण सरकन डोळ्यासमोरून जायची. पडलो, खरचटलं क़ी पांगळयाचा पाला चोपडायचा. (ह्या गोष्टी घरी कधीच कळल्या नाहीत ) रात्री चांदण्या पहायच्या. आजोबांच्या शिकारीच्या गप्पा ऐकायच्या. आपले आजोबा आता इथे वाघ आला तऱी त्याला पळवून लावतील या निर्धास्तपणावर छान झोप लागे.
सुट्टी संपल्यावर परत येताना पुढच्या वर्षासाठी सगळं नजरेत भरावे लागे. नुकत्याच लावलेल्या चाफ्याच्या रोपट्याचे काय होणार याची चिंता असे. गाडीत बसल्यावर भरलेल्या अंधारासोबत हे सगळं गायब होई. उजाडताच मुंबईत पोचलेले असू. शाळा सुरु होताच वर्गपाठ आणि गृहपाठ करताना मनातला जिप्सी घाबरून जाई. त्याला वर्ष संपायची ओढ लागे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा