गाडीने भाईंदर सोडलं आणि डब्यात एक परिचयाचा आवाज ऐकू आला. "मेरी आवाज की तरफ़ ध्यान दिजिये श्रीमान, सुनने का कुछ पैसा नहीं, देख़ने का कुछ पैसा नहीं" . पन्नाशीतला एक गृहस्थ आपल्या खर्जातल्या आवाजात हातातल्या प्रोडक्टच मार्केटिंग करत होता. रोज तीच लोकल गाडी पकडत असल्यामुळे मी त्याला चांगलाच ओळखतो. त्याच्याकडच्या वस्तू १० रुपये ते ३० रुपये या परवडेबल रेंज मधल्या असतात हे आपलं माझं निरीक्षण. सूया, मुंबई दर्शन गाइड, रेल्वेचं टाइमटेबल, दंतमंजन, वह्या, घरचा वैद्य नामक पुस्तिका, टॉर्च यातलं तो काहीही विकतो. लोकांच लक्ष कसं वेधून घ्यावं, हे त्याला बरोबर जमतं.
"घर, दुकान सब जगह काम आनेवाली चीज. (आता या ठिकाणी वस्तूच नाव) अगर बाजार मे इसकी किमत पुछने जाओ तो करीबन ६० से ७० रुपया होगी, लेकिन कंपनी के प्रचार के हेतू वही चीज आपको कम से कम दाम मे केवल १० रुपये मे दी जा रही है, मात्र १० रुपये, फक्त १० रुपये, ओन्ली टेन रुपीज"
"जो भाईसाब देखना चाहते है, देख सकते है, जो पाना चाहते है प्राप्त कर सकते है" मग तो एकेक सीट वर लोकांना बघण्यासाठी ती वस्तू देणार. काही जण उत्सुकतेपोटी पाहतात, काहींच्या मनात घेऊ का नको अशी चलबिचल होते. "आजकल १० रुपये में क्या आता है भाईसाब, वडापाव भी १५ रुपये का आता हैं" या त्याच्या वाक्याने "बरोबर आहे, घेऊया तर खरं. नाही चांगलं लागलं तर गेले १० रुपये म्हणायचं" असा विचार करून बरेच जण विकत घेतात. "पिछले दस साल से इसी लाईन पे सफर कर रहा हुं, कभी शिकायत नही आयी" हे वाक्य ज्यांनी वस्तू विकत घेऊनही ज्यांच्या मनात अजूनही शंका आहे त्यांना विश्वास देण्यासाठी.
गेली ४ - ५ वर्षे वेगवेगळ्या डब्यांत मला तो भेटलाय. बहुधा गर्दीच्या वेळा टाळून तो प्रवास करतो, पण गर्दी त्याला वस्तू विकण्याची चांगली संधी देते . मराठी, हिंदी वर त्याची चांगलीच कमांड आहे. इंग्रजीतली एखाद दुसरी कामचलाऊ वाक्ये त्याला येतात. तीच तो अधून मधून वापरतो. केसं पांढरी झालीयेत. दंतमंजन विकताना तंबाकू खाऊन लाल पिवळ्या झालेल्या दातांकडे तो सोयीस्कर दुर्लक्ष करतो. दाढीची खुटं थोडीफार वाढलेली आहेत. खांद्याला झोळी सारखी जड ब्याग आहे.
डोक्यावर बर्फ आणि तोंडात खडीसाखर. जिथे साध्या मुंगीलाही हलता येणार नाही अशा गर्दीच्या वेळी "भाईसाब जरा अंदर जाने दिजीये" म्हणत अभिमन्युसारखा तो आत शिरतो. वयाने शरीर थकले आहे याच्या खुणा दिसताहेत पण मिश्कीलपणा जात नाही. एकदा 'मुंबई दर्शन गाइडबुक' विकत होता, डब्यात कॉलेजला जाणारी बरीच तरुण मुलं-मुली होती. अशा वेळी त्याने आपले निरुपण सुरु केले.
"मित्रांनो, घर दुकान सगळीकडे उपयोगी येणारी गोष्ट. मुंबई दर्शन गाईडबुक ! मुंबईतील प्रेक्षणीय स्थळे, बाजार, सिनेमागृहे सगळ्यांची माहिती कुठे मिळेल? एकच उत्तर - मुंबई दर्शन गाईडबुक. समजा तुम्ही गर्लफ्रेंड बरोबर पिक्चर पाहायला जाताय. जवळच थिएटर कुठेय? कोण सांगेल?? एकच उत्तर - मुंबई दर्शन गाईडबुक.
गर्लफ्रेंड म्हणाली, चौपाटीला जाऊ, तर तिथे कुठली बस जाईल ? कोण सांगेल?? मुंबई दर्शन गाईडबुक.
गर्लफ्रेंड म्हणाली, बाहेर जेवूया, तर कुठले हॉटेल्स? कोण सांगेल?? मुंबई दर्शन गाईडबुक."
इतक्या विश्लेषणानंतर मुंबई दर्शन गाईडबुक खपलं नसतं तर नवल.
मी पण त्याच्याकडून बर्याच वस्तू विकत घेतल्या. त्याच्याकडच्या दंतमंजनाने दात शुभ्र होतात असे मला आढळले नाही, घरचा वैद्य कधीही मदतीला धावला नाही . पाठदुखी वरचा उपाय करताना जी घरगुती साधने म्हणून लिहिली होती ती सापडली नाहीत. पाठदुखी डॉक्टरच्या औषधानेच बरी झाली. मुंबईतच लहानाचा मोठा झाल्यामुळे मुंबई दर्शन गाईडबुक कधीही वापरले नाही. घरी पुस्तकांच्या कपाटात ते कोपर्यात पडलेले आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाचा फारसा उपयोग झाला नाही कारण माझी एक मैत्रीण रेल्वेचं चालतं बोलतं वेळापत्रक आहे. कधी अडल्यास सरळ तिलाच कन्सल्ट करतो.(आणि खरं बोलायचं तर ट्रेन कुठे वेळेवर धावतात) तरीपण या माणसाला जेव्हा भेटतो तेव्हा काही न काही विकत घेतोच. उपकार म्हणून नव्हे तर त्याच्या कौशल्याला दाद द्यावी म्हणून.
एकदा रात्री दहाच्या दरम्यान भेटला. शेवटची खेप असावी दिवसभराची. ओळखीचा चेहरा दिसल्यावर त्याने हात उंचावून ओळखल्याच दाखवलं. ट्रेन सोपार्याला रिकामी झाली तेव्हा त्याला विचारलं "कैसे हो?"
नेहमीचं उत्तर "बढीया". त्याची मुलं कॉलेजला जातात. मुलगा शेवटच्या वर्षाला आहे. त्याला बाबांनी आता आराम करावा असं मनात आहे. पण त्याने आधी शिक्षण पूर्ण करावं यावर हा ठाम.
"बच्चे अपने पैरो पे खडे हो जायेंगे तो फिर करेंगे आराम ! अब ट्रेन की भीड भी रोज बढती ही जा रही है, कभी सास फुल जाती है, देखते है कब तक चलती है सांसे. उपर वाले पे विश्वास है. ये भी दिन जायेंगे"
"हे ही दिवस जातील" हा सुखात संयम ठेवण्यास सांगणारं आणि दुखा:त धीर देणारं वाक्य आज त्याच्या तोंडून ऐकत होतो. स्टेशन आल्यावर त्याचा निरोप घेतला. आता जेव्हा भेटतो तेव्हा तेव्हा त्याच्या धडपडीमागील कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर येतो. माझ्याकडे पाहिल्यावर ओळखीचं स्मित करतो.

Khup Chhan
उत्तर द्याहटवा