एका लहान मुलगा कसलंतरी चित्र काढत बसला होता. त्याला घरातील एका मोठया माणसाने जरा जरबेतच विचारलं, "काय काढतोयस रे ?". मुलगा म्हणाला, "देवबाप्पाचं चित्र काढतोय". त्यावर त्या मोठ्या माणसाने जरा मिश्किल अंदाजात म्हटलं, "अरे पण देव दिसतो कसा हे कुणालाच माहित नाही, मग कसं काढणार तू चित्र ?". मुलगा फार गोड होता. त्याने मग उलटटपाली फार छान उत्तर दिलं. "माझं चित्र पाहून लोकांना कळेल - देवबाप्पा दिसतो कसा ते."
लहान मुलांमध्ये सर्जनशीलता अशी ठासून भरलेली असते. प्रश्नांना वेगळ्या पद्धतीने सामोरे जाण्याची, वेगवेगळी उत्तरं शोधण्याची, नवनिर्मितीची आस त्यांना असते. कधी ती एकटेच स्वताशी बडबडत बसतील. स्वतःच्या मनोराज्यात हुंदडत बसतील. हल्लीच वय वर्ष नऊच्या अद्वैत या मित्राला भेटलो. त्याच्याशी गप्पा झाल्या, त्याने काढलेल्या या चित्राविषयी. अद्वैत चौथ्या इयत्तेत आहे.
या चित्रात त्याने काय काढलंय ते पूर्णपणे abstract असल्याने व चित्रकलेतले मला काहीच कळत नसल्यामुळे खुद्द चित्रकारांना याबद्दल विचारण्यात आले. पहिलं चित्र हे Gun Tank (रणगाडा) आहे. पण त्यात फार वैशिष्ट्ये आहेत. एक तर हा रणगाडा detachable पार्टसचा आहे. याचे सगळे भाग केव्हाही सुटे होऊ शकतात. रणगाड्याला खाली चाके आहेत तेव्हा जमिनीवरील युद्ध त्याने लढता येते. हवाई हमल्यासाठी वरचा भाग आपोआप विलग होऊन जेट बनू शकतो. आणखी मजेशीर बाब म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत जेटचा भाग सुटा होऊन आतील व्यक्ती 'धूम' स्टाईल बाईकवरून सुसाट पळूही शकते.
या रणगाड्याच्या खाली दोन Weapon Tanks आहेत. पहिला Tank अल्त्रोन नामक रोबोचा आहे. त्याचं नाव त्याने Tank वर कोरलंय. तो आपल्यासारखे आणखी रोबो बनवू शकतो. तो बॉस आहे. दुसऱ्या Tank मध्ये शस्त्रे आहेत खूप सारी. आणि त्यात एक रखवालदार पण आहे. ही चित्रे पाहून मी ज्याम इम्प्रेस झालो आहे.
मुळात मला चित्रांमध्ये निसर्गचित्र तेवढं काढता येतं. त्यातही दोन डोंगर, त्यातून उगवणारा किंवा मावळतीचा सूर्य, चार आकडा दर्शवणारी आकाशातील पक्षी, घर, नदी , नदीतील त्रिकोणी मासे आणि घरापुढील सरळ रेषेतील गवत एवढं काढता येतं. अद्वैतची चित्रकला तुम्ही म्हणाल realistic नसेल. रणगाडा, रोबो जसेच्या तसे वाटत नसतीलही. पण त्याच्याशी बोलताना एक जिवंत चित्र त्याच्या डोक्यातून कागदावर उतरतं आहे हे जाणवत होतं. तो कल्पना जगत होता. डोक्यात चाललेल्या हजारो गोष्टींपैकी एक गोष्ट अल्त्रोनची असेल. त्या अल्त्रोनचं पुढे युद्धही झालं असेल कुणाबरोबर. त्याच्या मनोविश्वात त्याने रोबोंना जगावर ताबा मिळवताना पाहिलंही असेल. एक दिवस हे सर्व तो कागदावर उतरवेल हे नक्की.
मुलांच्या कल्पनांना फुलू दिलं, "आता हा अल्त्रोन कुठे चालला आहे, पुढे काय होईल तेही काढ चित्रात." असं प्रोत्साहन दिलं तर पुढे मागे तो चांगला कलाकार होईल, त्याला आपल्या कल्पना तुमच्याशी शेअर कराव्या वाटतील किंवा "असले नसते धंदे करण्यापेक्षा अभ्यास करा गणिताचा" म्हणत दटावलं तर हा रोबो, त्याबरोबरचं काल्पनिक जग आपोआप गुडूप होऊन जाईल हळूहळू.
जगाला हुशार व्यक्तींबरोबरच वेगळा विचार करणाऱ्यांची, सृजनशील लोकांची फार गरज असते. स्टीव जॉब्स ने आयफोन आणला बाजारात तेव्हा इतरही कंपन्या होत्याच ना स्पर्धेत. आज Apple आपलं स्थान टिकवून आहे ते सततच्या सृजनामुळे. मानवी प्रगती नवनिर्मितीचा आणि सृजनाचा ध्यास या दोन गोष्टींवर अवलंबून आहे.

Chaan lihale aahe Navnath Sir
उत्तर द्याहटवा