1. किशोर मासिकाचा जुना संग्रह
किशोर या मुलांच्या मासिकाचा शोध मला फार उशिरा लागला. ठकठक आणि चांदोबाचे जुने अंक यावरच आमचं बालपण गेलं. किशोर मासिकाचे जुने अंक (अगदी १९७१पासूनचे) ऑनलाईन उपलब्ध आहेत. जुने अंक चाळता सापडले कि यात दिग्गजांनी लिहिलंय. दुर्गाबाई, पुलं, कुसुमाग्रज, कुरुंदकर इ. इ.
या मासिकांत गोष्टी, कविता, माहितीपर लेख यांचा समावेश आहे. कव्हर पेजेस नॉस्टॅल्जिया जागवणारी आहेत. इंग्रजीतील न्यू यॉर्कर मासिकाची कव्हर पेजेस अशी इंटरेस्टिंग असतात. उदाहरणादाखल:-
जुने आणि नवीन अंक पुढील लिंक वर वाचता / डाउनलोड करता येतील.
https://kishor.ebalbharati.in/Archives/
2. The cooking of books: a literary memoir
"लेखकाच्या आयुष्यात त्याच्या जोडीदारानंतर जर कुठली महत्वाची व्यक्ती असेल तर ती म्हणजे संपादक" असे रामचंद्र गुहा म्हणतात. त्यांचे नवीन पुस्तक हे एक प्रकारे साहित्यिक आत्मकथन आहे. यात त्यांनी रुकून अडवाणी या त्यांच्या संपादकाविषयी भरभरून लिहिलंय. त्यांच्या पुस्तकांना व साहित्यिक कारकिर्दीला आकार कसा येत गेला, या प्रवासात त्यांच्या संपादकाची भूमिका काय होती यावर त्यांनी लिहिलंय. गुहा नामांकित इतिहासकार आहेत. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांना अडवाणी यांच्यासारखा संपादक लाभला. अडवाणी Oxford University Press India च्या संपादक मंडळात होते. त्यांनी गुहा यांची सुरुवातीची पुस्तके छापली.
वयपरत्वे हे नातं अजून घट्ट बनत गेलं. एखाद्या पुस्तकावर संपादकीय संस्कार होत असताना लेखक आणि संपादक यांच्यात क्राफ्टच्या अनुषंगाने पत्रांद्वारे काय चर्चा होत होती ते वाचायला वाचकांना आवडेल.
3. इंदिरा संत यांची कविता: पत्र लिही
पत्र लिही पण नको पाठवू
शाईअमधुनी काजळ गहिरे
लिपिरेषांच्या जाळी मधुनी
नको पाठवू हसू लाजरे;
चढण लाडकी भुवईमधली
नको पाठवू वेलांटींतुन
नको पाठवू तिळ गालिचा
पुर्णविरामाच्या बिंदूतुन
नको पाठवू अक्षरातुनी
शब्दामधले अधिरे स्पंदन,
कागदातुन नको पाठवू
स्पर्शामधला कंप विलक्षण
नको पाठवू विज सुवासिक
उलगडणारी घडी घडीतुन,
नको पाठवू असे कितीदां
सांगितले मी; तू हट्टी पण
पाठविसी ते सगळे सगळे
पहिल्या ओळीमध्येच मिळते
पत्र पुढचे त्यानंतर पण
वाचायचे राहुन जाते.
4. कानगोष्टी: All you have is now!
5. Watchlist: Night and Fog
कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्स, होलोकास्टवर बनवलेली मी पाहिलेली प्रामाणिक डॉक्युमेंटरी.
Night and Fog from UMSchoolOfCommunication on Vimeo.