मराठीत बालसाहित्यात हल्ली कुठे नवीन प्रयोग होऊ लागलेत. आपल्याकडे लहान मुलांसाठी असलेली दर्जेदार पुस्तके कमीच आहेत. त्यामानाने इंग्रजी भाषेत बालसाहित्यात नवनवीन प्रयोग होताहेत. मुलांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या जाणीवा समृद्ध व्हाव्यात यासाठी तिथे प्रयत्न केले जातात. पुस्तकांच्या विषयापासून ते पुस्तक छपाईपर्यंत खोलवर विचार केला जातो. मुलांच्या वयोगटानुसार त्यांनी काय वाचावं, त्यांची शब्दसंपत्ती कशी वाढेल, आजूबाजूच्या जगाची त्यांना ओळख कशी होईल, उत्कृष्ट साहित्याचे लहान मुलांसाठी संक्षिप्तिकरण (Abridged Edition ) जेणेकरून त्यांना साहित्यात रुची वाटेल या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. अक्षरांना सुंदर चित्रांची साथ लाभते आणि वाचन हा एक आनंदानुभव बनतो.
ऑलिवर जेफर्स (Oliver Jeffers) या लेखकाचं " दि हार्ट अँड दि बॉटल " हे पुस्तक काही दिवसांपूर्वी वाचनात आलं.
लहान मुलांना 'मृत्यू' या संकल्पनेपासून आपण दूरच ठेवतो. त्यांच्या कोवळ्या मनावर आघात होईल असे आपल्याला वाटते. रोज आपल्याशी खेळणारे आजोबा आज शांत का झोपलेत या प्रश्नावर 'आजोबा देवाघरी गेले' असे सांगून आपण वेळ मारून नेतो. आपली जवळची व्यक्ती गमावण्याची भावना त्यांना कळू नये असं आपल्याला वाटतं. वाढत्या वयाबरोबर आपोआप त्यांना हे कळत जाईल असा विचार त्यामागे असतो (काही वर्षांपूर्वी आणि आजही लैंगिक शिक्षणाबाबतही असाच दृष्टीकोन समाजात आहे.)
ज्यांना लहान वयातच आपल्या जवळच्या व्यक्ती गमवाव्या लागतात ते हे दु:ख कसे पचवतात? या दु:खाच्या आघातातून सावरतात का स्वतःला? या विषयावर हे पुस्तक आहे.
प्रत्येक गोष्टीबद्दल जिज्ञासू असलेल्या एका लहान मुलीची ही गोष्ट.Once there was a girl, much like any other. बाबांची लाडकी लेक असलेल्या या मुलीचं भावविश्व फार अनोखं आहे.बाबा आपल्या खुर्चीवर बसून तिला पुस्तकांतल्या गोष्टी सांगायचे. तिला आकाशातल्या चांदण्यांत रस आहे, समुद्राच्या तळाशी काय आहे हे तिला जाणून घ्यायचय. तिला नवीन गोष्टी शोधायला आवडतात.
आणि एके दिवशी बाबांची खुर्ची रिकामी होते. बाबांच्या मृत्यूचा आघात पचवताना ती अंतर्यामी कठोर होत जाते आणि ठरवते कि यापुढे असले कुठलेच दु:ख नको. ती आपले हृदय एका बाटलीत काढून ठेवते (या रूपकाचा अर्थ असा कि ती संवेदनशून्य बनत जाते.) आता तिला कुठल्याच गोष्टीची उत्सुकता वाटेनाशी होते.
रोजच्या जगण्यात सुरवातीला काहीच फरक पडत नाही, पण मनाच्या तळाशी दडवलेलं दु:ख बाहेर यायला धडपडत असते. व्यक्त होणंच विसरलेल्या मुलीला आपले बाटलीबंद हृदय कसे काढावे कळत नाही. ती हरतऱ्हेचे प्रयत्न करते पण बाटलीतून हृदय निघेच ना.
आणि एकेदिवशी तिला तिच्याच सारखी जिज्ञासू छोटी मुलगी भेटते आणि तिचे हृदय बाटलीतून बाहेर काढून देते. आता हृदय परत मिळाल्यावर तिला परत जगाविषयी प्रेम वाटू लागते. बाबांची खुर्ची मग कधीच रिकामी राहत नाही.
जवळच्या व्यक्तीच्या अचानक जाण्याने आयुष्याबाबत आपण उदासीन होतो, प्रसंगी काहीजणांच्या मनात आत्महत्येचे विचारही येतात. चलती का नाम जिंदगी म्हणत, मृत्यू ह्या सार्वकालिक सत्याला स्वीकारून पुढे चालत राहणं एवढंच आपल्या हातात आहे.
लहान वयातच मुलांना 'मृत्यू' या विषयाची ओळख करून देणं काहींना पटणार नाही. पण निसर्गाचा उत्पत्ती, स्थिती आणि लयाचा नियम त्यांना जितक्या लवकर समजवाल तितक्या लवकर त्यांची भावनिक तयारी होईल.
***

Apratim lihlai kimbahoona garbitarth faar changlya prakare sangitlai... Bhavanana wacha Ani shabda roopat uttam madly.
उत्तर द्याहटवा